शनिवार, १४ जानेवारी, २०१७

बस्स झाल आता प्रेम करणं
तिच्याच यादेत घुटमळत राहाणं

तीन दिलेल्या प्रेमपत्रांना उत्तर देण
झोपेतही तिचेच स्वप्न पाहत राहाणं

तिन म्हणेल ते निमुटपणे करणं
तिच्या रागाला आपल्यापरीण थमवीण

ती दिसली नाही म्हणून मन विचलित करणं
ती आता तरी येईल म्हणून वाट पाहत बसण

तिला पाहण्यासाठी तिच्या गल्लीत जाणं
ती दिसताच तिला इशारे करणं

भेट झाली नसेल तर मेसेज वर भागवण
प्रेमासाठी दोघांनीही शपथा घेण

बस्स झाल आता प्रेम करणं
तिच्या सोबत राहिलेल्या क्षणांना अनुभवण

तिने दिलेल्या प्रत्येक गोष्टीला सांभाळून ठेवण
तिच्याच साठी आपणही उपाशी राहणं

तिच्या विरहाने तडफडून रडत बसण
आता तिच्याही मनात हेच विचार असण

तीच मला पाहून न पाहिल्यासारख करणं
तिच्या प्रेमाच्या प्रवाहात वाहत राहणं

ती आपलीच आहे समजून जीव लावण
बस्स झाल आता प्रेम करणं

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा