*💪 💪 यळकोट येळकोट जय मल्हार.. सदानंदाचा यळकोट येळकोट 💪💪💪* आज आपल्या धनगर समाजाची राजकीय अवस्था खुप बिकट झाली आहे अजुन ही समाज संघटनेचे काय फायदे आहेत हे अजुनही समजु शकला नाही. बर्याच ठिकाणी आपल्या धनगर समाजाचि लोकसंख्या ही जवळ जवळ 70 ते 80 %आहे. तरी आपली काय पावर आहे हेच कळले नाही. परंतु आपल्या समाजाचा वापर काही मुठ्ठीभर दोन तीनच घर असतात ते पुर्ण गाव चालवतात. आणि आपला समाज जातो त्याच्या मागे मेंढ्या सारखे खाली मान घालून जिकडे जाय म्हटले तिकडे जायचे. आपल्या समाजाला सादी आणि सरळ गोष्ट समजत नाही की आपल्या समाजाच्या लोकसंखेवर वरची मंडळी लक्ष घालते ना की ऐखाद्या चमच्याकडे पाहुन लक्ष घालतात. उदा. जर एखाद्या जिल्ह्यात सत्ता शिवशेनेची आहे आणि ज्या गावातील ज्या समाजाची लोकसंख्या ही 50 %च्या वर असेल तर या 50%लोकांनच्या भरवशावर दुसर्या समाज चे लोक शिवशेनेचे राजकारण करतात ते म्हणजे चमचे . आणि समोरचा माणुस म्हणजे खासदार ज्याच्या ताब्यात पुर्ण जिल्हा असतो. तो या गावचे कामे तो या चमच्या कडे बघुन नाही करत तो करतो ते तुमच्या लोकसंखेमुळे समाज संघटने मुळे करतो. पण हे चमचे म्हणतात आमच्या मुळे झाले. हा खुप खोटा समज असतो. हे उदाहरण झाले. पण बर्याच ठिकाणी ह्या गोष्टी आहेत आपल्या समाजाच्या भरवशावर हे मुठ्ठीभर प्रस्तापित स्वत साठी तिकिटे मागतात. ते पण ऐक निष्ट नसतो पण आपण ऐक निष्ट पणा जपतो आणि या चमच्यासारखे सड्या सारखे रंग बदलनारे पार्ट्या बदलनारे चमचे निष्ठा बदलुन लगेच दुसरा रुमाल गळ्यात घालून मिरवतात. तो त्या पक्षा साठि ऐक निष्ठ नाही राहत तर तुमची काय बिशाद. अस्याने काय होते आपला समाज या सत्ताधारी चा पण राहात नाही आणि या चमच्याचा पण नाही राहात. आणि या चमच्या ची पडण्याची ग्यारंटी जास्त असते कारण कोणी पण इचार करल कि. हा माणुस या पक्षासी ऐक निष्ठ नाही राहिला तर आपले काय खरे होणार आहे असे विचार करतील लोक. म्हणून मित्रांनो आपले मेंढि वळण सोडून द्या ज्याची चालती आहे त्यांनाच साथ करा विनाकारण अस्या चमच्या लोकांन च्या नांदी लागुन स्वत चे व समाजाचे नुकसान करुन घेवु नका. जिथे आपला समाज जास्त असेल तिथे ऐकी दाखवा तुम्हाला चमच्याचा सहारा घ्यायचा काम पडणार नाही. आणि विशेष म्हणजे हे प्रस्तापित आपल्याला खुप हलकट आणि वेडे समजतात. ते आपला केवळ वापर करून घेतात आणि हेच चमचे लोक आपले कामे अडचणी फुकट करतात का अजिबात नाही मग तो आपला देव आहे का त्याची गोष्ट अयकाले. जिथे चांगला माणुस उभा असेल तर तिथे त्याला सपोट केला पाहिजे मग तो कोणत्याही पक्षाचा उमेदवार असो. बाकि नंतर जर दुसरे समाज मतदानाले ऐक होतात तर आपल्याला काय झडपणी झाली ऐक व्हायले. निदान निवडनुकि पुरते का व्हा न पण. ऐकी दाखवा 🙏🙏🙏🙏🙏जय मल्हार 🙏🙏🙏🙏🙏जय अहिल्याई 🙏 🙏🙏🙏जय यशवंत राजे 🙏 *🙏🙏 🙏 जय शिवराय
आपलाच एक मित्र
✍ *किसन गावडे*
रा. तिंगाव ता. वडवणी जि. बि
मो. नं. 7057735184
Whatsapp n. 7066877741
Kisangawade.blogspot.com
आपलाच एक मित्र
✍ *किसन गावडे*
रा. तिंगाव ता. वडवणी जि. बि
मो. नं. 7057735184
Whatsapp n. 7066877741
Kisangawade.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा